विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
विवाहितेचा पैशांची मागणी करत छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या ६ जणांविरोधात बुधवार, १९ एप्रिल रोजी रात्री वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील माहेर असलेल्या किरण शुभम भदाणे यांचा जळगाव शहरातील हरेश्वर नगरातील शुभम जयवंतराव भदाणे यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर किरण हिला पती शुभम यांच्यासह सासरच्यांनी गाडी घेण्यासाठी माहेरुन पैसे आणावेत अशी मागणी केली, याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिलेल्या तक्रारीवरुन किरण हिचे पती शुभम जयवंतराव भदाणे, प्रतिभा जयवंतराव भदाणे दोन्ही रा. हरेश्वर नगर, जळगाव, नणंद धनश्री राजीव भामरे, नंदोई राजीव प्रकाश भामरे दोन्ही रा. धुळे, नणंद मयुरी अतुल सोनवणे, व नंदोई अतुल सोनवणे दोन्ही रा. अमळनेर या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक प्रदीप पाटील पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.