रेस्टोरेंट स्टाइल क्रीम ऑफ टोमॅटो बेसिल सूप

0

खाद्यसंस्कृती विशेष 

 

साहित्य:

५०० ग्रॅम टोमॅटो, १ जुडी बेसिल पाने, २ चमचे साखर, १ मोठा चमचा कॉर्नफ्लावर (सूपला  दाटपणा येण्यासाठी), १ मोठा चमचा लोणी, ४ पाकळया लसूण, १/४ चमचा मिरीपूड, मीठ चवीनुसार, क्रीम किंवा फेसलेली दुधाची साय सजावटीसाठी:

पावाचे भाजलेले किंवा तळलेले तुकडे सजावटीकरता

पाणी (आवश्यकतेनुसार)

( मोठा चमचा- टेबलस्पून आणि चमचा -टिस्पून)

 

कृती:

१. प्रथम टोमॅटो व बेसिल पाने स्वच्छ धूवून घ्या.

२. एका भांडयात पाणी घेउन गॅस चालू करून मिडीयम आचेवर पाणी गरम करून घ्या.

३. पाण्याला उकळी आली की त्यात टोमॅटो आणि बेसिलची पानं घालून ५ मिनिटे उकळू दया.

४. नंतर गॅस बंद करुन टोमॅटो थंड होऊ दया.

५. आता टोमॅटोची साले काढा.

६. टोमॅटो व बेसिल पानं मिक्सरमध्ये  किंवा ब्लेंडरने प्यूरी करा आणि ही प्यूरी चाळणीने गाळून घ्या.

७. आता एक भांडे गॅस वर ठेवा. त्यात लोणी घाला, लसूण, ४/५ बेसिल पाने, कॉर्नफ्लावर, घालून नीट चमच्याने ढवळत रहा.

८. आता टोमॅटो प्यूरी व मीठ घाला, नंतर साखर, मिरीपूड घालून नीट ढवळत रहा. म्हणजे गुठळया होणार नाही.

९. तयार आहे तुमचे चविष्ट सूप, क्रीम व कृटोन्सने सजवा.

१०. गरम गरम सर्व्ह करा.

 

– अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर

९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.