संतापजनक; तरुणीने केली मामाच्या मुलाची जिवंत जाळून हत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्लीत वजिराबाद याठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने आपल्याच मामाच्या मुलाची जिवंत जाळून हत्या केली आहे. तरुण मामाच्या मुलीच्या एकतर्फी प्रेमात होता आणि तिला तो त्रास द्यायचा. या जाचाला कंटाळून तरुणीने टोकाचे पाऊल उचललं आणि तरुणाला संपवलं.

सविस्तर माहितीनुसार, तरुणाचे नाव अब्दुल्ला असून, तो परिवारासह संगम विहार भागात राहत होता. डिलिव्हरी बॉय म्हणून तो काम करत होता. तर सानिया असे आरोपी तरुणीचे नाव आहे. अब्दुल्ला मामाची मुलगी सानियाच्या एकतर्फी प्रेमात होता. सानियाने आपल्यासोबत लग्न करावं अशी त्याची इच्छा होती. यातूनच तो तिला सतत त्रास देत असे, त्याच रागातून तिने तरुणाची हत्या केली.

सानियाने गुरुवारी अब्दुल्लाला घरी बोलावून घेते. अब्दुल्ला घरी आल्यावर त्याच्यासाठी चहा आणण्यासाठी म्हणून सानिया किचनमध्ये गेली. त्यानंतर काही वेळाने सानिया बाटलीत पेट्रोल घेऊन आली आणि अब्दुलावर ओतले आणि त्याला पेटवून दिले.

आग लागल्यानंतर अब्दुल्लाघरातून बाहेर पडला आणि रस्त्यावर धावत सुटला. त्याने त्याच्या अंगावरचे कपडे काढले. मात्र, तोपर्यंत पूर्णपणे भाजला होता. स्थानिक लोक अब्दुल्लाच्या मदतीला धावले आणि आग विझवली. घटनेची माहिती काहींनी पोलिसांना दिली. या घटनेत अब्दुल्लागंभीररीत्या भाजला गेला होता. त्याला एलएनजेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एकतर्फी प्रेमातून अब्दुल्ला सानियाला त्रास देत होता. यालाच कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अब्दुल्लाचा मृत्यू होण्यापूर्वी त्याने पोलिसांना सांगितले की, सानियाने त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Leave A Reply

Your email address will not be published.