कोरोनाचे पुन्हा संकट: आढळले 111 रुग्ण, एकाचा मृत्यू; केंद्राचा राज्यांना इशारा

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरोनाच्या संकटाने पुन्हा एकदा भारतात दस्तक दिली आहे. याचा सर्वाधिक परिणाम केरळमध्ये दिसून येत असून तब्बल 111 कोरोना रुग्ण एकाच दिवसात आढळून आले आहेत. त्यामुळेच केरळच्या शेजारील राज्ये कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सावधगिरी बाळगत आहेत, तर केंद्र सरकारनेही याबाबत राज्यांना सतर्क केले आहे.

केरळमध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये झालेली वाढ आणि JN.1 व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळून आल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्राने सोमवारी राज्यांना अॅडव्हायजरी जारी कडून कोविड परिस्थितीवर राज्यांनी सतत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

https://x.com/ANI/status/1736728911768359291?s=20

केरळमध्ये वेगाने प्रादुर्भाव

सोमवारी केरळमध्ये कोविड-19 चे 111 नवीन रुग्ण आढळल्यानंतर उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,634 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण 127 प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी 111 प्रकरणे एकट्या केरळमधील आहेत. केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोविड-19 मुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यासह गेल्या तीन वर्षांत राज्यातील कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 72,053 वर पोहोचली आहे.

केंद्राचा राज्यांना इशारा

कोरोनाचे वाढते आकडे लक्षात घेता केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देशात कोविड-19  आणि JN.1 प्रकारातील पहिल्या प्रकरणांवर सतत लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सातत्यपूर्ण आणि सहयोगी कार्यामुळे आपण COVID-19 प्रकरणांची संख्या कमी करू शकलो. परंतु कोविड-19 विषाणूचा उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी गती कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.

केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना

सुधांश पंत यांनी आपल्या पत्रात आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्याची आणि वेळेत नवीन प्रकार शोधण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी संक्रमित आढळलेले नमुने भारतीय SARS CoV-2 Genomics Consortium (INSACOG) प्रयोगशाळांमध्ये पाठवण्याच्या गरजेवरही भर दिला. JN.1 (BA.2.86.1.1) चे पहिले प्रकरण भारतात नोंदवले गेले होते हे लक्षात घेऊन पंत यांनी या प्रकाराबद्दल तपशील देखील प्रदान केले आहेत. त्यांनी म्हटले की JN.1 (BA.2.86.1.1) हा व्हेरिएंट 2023 च्या शेवटी आढळून आला आणि तो SARS CoV-2 च्या BA.2.86 (पिरोला) गटाशी संबंधित आहे. अमेरिका, चीन, सिंगापूर आणि भारतात JN.1 प्रकाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. चीनमध्ये या सब व्हेरिएंटची 7 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. इतर देशांमध्ये तो आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी अधिक अनुवांशिक अनुक्रम डेटा आवश्यक आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.