भरधाव मिनी बस चालकाने तरुणाला नेले फरफटत, चालकावर गुन्हा दाखल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. अगदी छोट्या कारणावरून एका व्यक्तीला मिनीबसच्या बोनेटवर ३ किमीपर्यंत लटकवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी दक्षिण दिल्लीच्या कोटला मुबारकपूर भागात ही घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक व्यक्ती मिनीबसच्या बिनेटवर लटकलेली आहे. ती मोठ्याने ओरडताना दिसत आहे. गाडी थांबण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मिनीबस ड्रायव्हर गाडी थांबण्याच्या मनःस्थितीत नाही. विकी कुमार या व्यक्तीसोबत हा जीवघेणा प्रकार घडला आहे. तर या प्रकरणी आरोपी मनोज कुमारला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी कुमारने कँटर ट्रक आणि मिनीबस यांची धडक थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मिनीबसच्या ड्रायव्हरने विकीला बोनेटवर बसवून फरफटत नेले. तब्बल ३ किमी अंतरापर्यंत बसचालकाने त्यांना बोनेटवर नेले.

रात्री ११.३० वाजता एका व्यक्तीचा (विकी) फोन आला. एका मिनीबसने आपल्या मिनी ट्रकला धडक दिल्याची तक्रार त्याने केली. मिनीबस चालकाने मला बोनेवर लटकवत ३ किमीपर्यंत नेल्याची आपबिती देखील फोन केलेल्या व्यक्तीने सांगितली. पीडित व्यक्ती बस थांबवण्याची विनंती करत होता, मात्र ड्रायव्हरने बस थांबवली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून मिनीबस जप्त केली आहे. . पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मनोजला अटक केली असून अधिक तपास करत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.