सावधान; देशात पुन्हा कोरोनाचे संकट, २४ तासात इतक्या जणांचा मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

देशात सध्या कोरोनामुळे आणखी चिंता वाढवण्याची शक्यता दिसून येत आहे. केरळ राज्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे. मंगळवारी (दि.१९ ) तब्बल २९२ कोविड रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता केरळमध्ये २०४१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तसेच एकाच दिवसात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने नागरिकांना न घाबरण्याचे आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

गेल्या काही वर्षांपासून जगाची झोप उडवणाऱ्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा धाकधूक वाढवली आहे. कोरोना व्हायरस आणि कोरोनाच्या संसर्गाबाबत पुन्हा एकदा सर्तकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविडचा नवा सबव्हेरियंट भारतात आल्याचं समोर आलं आहे. कोविड-१९ चा सबव्हेरियंट JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये आढळून आलं आहे. JN.1 व्हेरिएंटचे पहिले प्रकरण समोर आल्याने केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देखरेख ठेवण्यास सांगितले.

राज्यात मंगळवारी 11 नवीन रुग्ण आढळले
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे ११ नवीन रुग्ण आढळले. त्यापैकी आठ केवळ राजधानी मुंबईत आढळून आले. आतापर्यंत ३५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी २७ फक्त मुंबईत सापडले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत २७, पुण्यात २ आणि कोल्हापुरात एक रुग्ण सक्रिय आहे. आयसोलेशनमध्ये २३ रुग्ण आहेत. मंगळवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मुंबईत कोरोनाचे २७ रुग्ण आढळले आहेत. तर, ठाणे जिल्ह्यात ५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.