Saturday, January 28, 2023

कोरोनाचं पुन्हा सावट, केंद्र आणि राज्याचा महत्वाचा निर्णय

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून चीन आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर याची प्रकरण दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून भारतातही केंद्र सरकारनं राज्यांसाठी पत्राद्वारे मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

- Advertisement -

सध्या कोरिया, जपान, अमेरिका आणि चीनमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढत आहे. यासंदर्भात केंद्राने राज्यांना एक पत्र लिहिलं असून यामध्ये जिनोम सिक्वेंसिंगसाठी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे अहवाल पाठवायला सांगितले आहेत. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी NCDC आणि ICMR ला देखील याबाबत पत्र लिहिलं आहे. यामध्ये देखील जिनोम सिक्वेंसिंगवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. जिनोम सिक्वेसिंगद्वारे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची माहिती मिळू शकेल. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्ये आणि केंद्रसाशित प्रदेशांना एक पत्र लिहून जपान, अमेरिका, कोरिया, ब्राझील आणि चीनमध्ये कोरोनाच्या प्रकरणात अचानक वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील पॉझिटिव्ह प्रकरणांच्या सँपल्सची जिनोम सिक्वेंसिंग गरजेची असल्याचं म्हटलं आहे.

तसेच या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यासह केंद्रातही कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे. हा टास्क फोर्स राज्यातल्या कोरोना परिस्थितीबाबत सरकारला सूचना करणार आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.

अद्याप देशात कोरोनाची प्रकरणं सामान्य आहेत. केंद्राच्या आरोग्य खात्यानं मंगळवारी २० डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, गेल्या २४ तासांत देशात ११२ नवी प्रकरणं समोर आली आहेत. तसेच अॅक्टिव्ह प्रकरणांतही घट झाली आहे. आता देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या ३४९० राहिली आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या संसर्गानं तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मार्च २०२० नंतर दैनंदिन कोविडच्या प्रकरणात मृतांची संख्या सर्वात कमी आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे