संत बाबा मेठाराम साहेबांचा ५० वा वार्षिक उत्सव साजरा

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

सिंधी समाजाचे महान संत बाबा मेठाराम साहेब यांचा ५० वा वार्षिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा महोत्सव सिंधी कॉलनीमध्ये संत बाबा मेठाराम साहेब यांच्या मंदिरात दि. १८ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत साजरा करण्यात आला. याप्रसंगी देशातील विविध भागांतून साधु संतांनी आपली हजेरी लावली होती.

याप्रसंगी तिन्ही दिवस दररोज सकाळी संत बाबा मेठाराम साहेब यांचा प्रतिमेला पंचामृत अभिषेक करून दिवसाची सुरूवात होत होती. तसेच वेगवेगळ्या राज्यातुन आलेल्या संत महात्म्यांचे भक्तीमय कार्यक्रमांचा भक्तांनी मनसोक्त आनंद लुटला. दररोज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी व साधुसंतांप्रती आदर भाव आणि समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडत होते. शेवटच्या दिवशी विविध राज्यांतील जवळपास ५० पेक्षा अधिक साधुसंतांचा एकच २५ फुटी पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

यावेळी साधु संतांनी उपस्थिती देत कार्यक्रमांची शोभा वाढवून समाजात एकता व बंधुभाव निर्माण व्हावा यावर भर दिला. तसेच देशात शांतता सुखसमृद्धी नांदावी, समाजात एकता अखंडता अबाधित राहावी अशी प्रार्थना केली. याप्रसंगी पाचोरा शहरातील सर्व समाज बांधव उपस्थित होते. शेवटी सर्व उपस्थितांचे पाचोरा सिंधी पंचायतच्या वतीने मुखीसाहेब मोटुमल नागराणी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शहरातील नवयुवक मंडळांनी अथक परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.