एका दिवसात देशात ११ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले

0

दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क

करोनाने (Corona) पुन्हा एकदा सर्वांच्या चिंतेमध्ये भर पाडली असून देशामध्ये करोनाचा (Corona Virus) वेगाने प्रसार होत असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

रोज करोना रुग्णांचा धडकी भरवणारा आकडा समोर येत आहे. अशामध्ये गुरुवारी एका दिवसामध्ये देशात ११ हजारांपेक्षा अधिक करोना रुग्ण आढळले आहेत. हा आतापर्यंत सर्वांत मोठा आकडा आहे. त्यामुळे केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचे देखील टेन्शन वाढले आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात नव्या ११ हजार १०९ करोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या ४९ हजार ६२२ वर गेली आहे. धक्कादायक म्हणजे काल दिवसभरात देशात २० मृतांची नोंद करण्यात आली आहे.

भारतात आढळलेल्या करोनाच्या प्रकरणांमध्ये, XBB.1.16 या नवीन प्रकारातील ३८ टक्के प्रकरणे आढळून येत आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगचे निरीक्षण करणार्‍या INSACOG च्या मते, देशातील दैनंदिन करोना प्रकरणांपैकी ३८.२% प्रकरणे XBB.1.16 प्रकारातील आहेत.

INSACOG ने गुरुवारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये सांगितले की, मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत घेतलेल्या नमुन्यांमध्ये ओमिक्रॉनचा XBB प्रकार सर्वाधिक असल्याचे आढळून आले. विशेषतः भारताच्या पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भागात. बुलेटिनमध्ये असे म्हटले आहे की XBB.1.16 हा नवीन प्रकार भारताच्या विविध भागांमध्ये दिसला आहे.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात करोनाचे १ हजार ०८६ रुग्ण आढळले आहेत. येथे दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत करोनाचे ५ हजार ७०० सक्रिय रुग्ण आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत करोनाचे २७४ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोनाचे १ हजार ६३५ सक्रिय रुग्ण आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.