इंदिरा गांधी विद्यालयात संविधान दिवस जनजागृती कार्यक्रम संपन्न…

0

 

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

म.जिल्हा विधिसेवा प्राधिकरण जळगाव व दिवाणी व फौजदारी न्यायालय व वकील संघ धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय धरणगाव येथे संविधान जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.(Constitution Day awareness program)

कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आले, हे सामूहिक वाचन कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी व फौजदारी न्यायालय धरणगावचे न्यायाधिश अविनाश ढोके यांनी केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी व प्रस्ताविकेच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी न्यायाधिश अविनाश ढोके, सहन्यायाधीश आशिष सूर्यवंशी, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे सचिव सी के पाटील,  विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा पाटील, वकील संघाचे अध्यक्ष आर एस पाटील, उपाध्यक्ष कैलास मराठे, सिनियर विधिज्ञ व्ही एस भोलाने, सी झेड कट्यारे, आर एस शिंदे, ऍड संदीप सुतारे, ऍड आसिफ कादरी, ऍड गणेश मांडगे, ऍड राहूल बडगुजर, ऍड मनोज दवे, ऍड एकनाथ पाटील वकील संघाचे पदाधिकारी प्रा व्ही जी पाटील प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक बळवंत पाटील, आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे, पर्यवेक्षक ए एस पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड गजानन पाटील यांनी केले, तर राज्यघटना कलम 21 संबंधी मार्गदर्शन ऍड संदीप पाटील यांनी केले. तसेच संपत्ती मूलभूत अधिकार संबंधित मार्गदर्शन ऍड महेंद्र चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहन्यायाधीश आशिष सूर्यवंशी यांनी घटनेचे मूलभूत अधिकार यांच्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश अविनाश ढोके यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सविस्तर विवेचन केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी, तालुका वकील संघ, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श माध्यमिक विद्यालय, आदर्श प्राथमिक प्राथमिक शाळा, व्ही जी पाटील प्राथमिक विद्यामंदिराचे सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी वृंद आदींनी काम पहिले. सूत्रसंचालन ऍड प्रशांत क्षत्रिय तर आभार प्रदर्शन संदीप सुतार यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.