मोठी बातमी; काँग्रेसच्या ५ खासदारांवर निलंबनाची कारवाई

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

काँग्रेसच्या पाच खासदारांवर निलंबनाची कैवारी करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या पाच खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान गदारोळ आणि गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीत ते कामकाजात सहभागी होऊ शकत नाही.

टीएन प्रतापन, हिबी इडन, एस. ज्योतिमणी, रम्या हरिदास, डीन कुरियाकोस यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय आजच तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.