पोटाच्याच मुलांनी केला जन्मदात्या आई-वडिलांचा घात

जादूटोण्याच्या संशयातून केली आई-वडील आणि भाचीची हत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरी गावात ६ डिसेंबर रोजी झालेल्या वृद्ध दाम्पत्य आणि एका दहा वर्षीय बालिकेच्या हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यात गडचिरोली पोलिसांनी यश आलं आहे. दोन मुलं आणि पाच नातेवाईकांनी मिळून जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध आई-वाडील आणि भाचीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

दोन मुलं आणि पाच नातेवाईकांनी मिळून जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध आई-वडील आणि भाचीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मुलगा रमेश कुमोटी, दुसरा मुलगा विनु कुमोटी तसेच त्याचे नातेवाईक जोगा कुमोटी, गुना कुमोटी राजू आत्राम, नागेश उर्फ गोलु येमला, सुधा येमला, कन्ना हिचामी तसेच मृतकाचा जावई तानाजी कंगाली असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?
६ डिसेंबरला रात्री ६० वर्षीय देऊ कुमोटी आणि त्यांच्या पत्नी बीचे देऊ कुमोटी यांच्यासह १० वर्षीय नात अर्चना तलांडी यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली होती. या संदर्भात मृतकाचा मुलगा विनु देवु कुमोटी यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन आलदंडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा तपास करतांना तक्रार करणाऱ्यांवर संशय आल्याने पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली.

देवु कुमोटी हा या परिसरातील मोठा पुजारी आहे. तो जादूटोणा करुन अनेक लोकांना आजारी पाडून पुढे त्यांचा मृत्यु होतो, असा संशय गुंडापुरीतील आणि त्या परिसरालगत असलेल्या काही गावांमध्ये होता.

पोलिसांच्या तपासात काय उघड झालं?
पोलिसांच्या तपासात परिसरात जे व्यक्ती मृत्युमुखी पडले, ते कॅन्सर व अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त असतांना देखील त्यांचे नातेवाईक त्यांना वैद्यकीय उपचार न देता वेगवेगळ्या पुजाऱ्यांकडे न्यायचे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत जास्त बिघाड होऊन ते मृत्युमुखी पडले, असे समोर आले.

Leave A Reply

Your email address will not be published.