खून का बदला खून; जळगावात सिने स्टाईल थरार…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

चित्रपटाला साजेशी बदला घेण्याची घटना आज जळगावात घडली आहे. आपल्या मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बापाने चक्क जळगावच्या कोर्टाट मुस्लीम महिलेचा वेश घेऊन, आपल्या मुलाच्या खुनातील आरोपींना मारण्याच्या हेतूने आला होता. आज संशयित आरोपींना न्यायालयात सुनावणीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाल्याने कोर्टात येऊन संशयित आरोपींना ठार मारण्यासाठी त्यांनी हा वेश घेतला होता. पण त्याची एक चूक पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर सर्व सत्य बाहेर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, भुसावळ तालुक्यातील नशिराबाद येथे सप्टेंबर महिन्यात धम्मप्रिय सुरळकर याचा खून झाला होता. या प्रकरणातील संशयित आरोपीना आज कोर्टात आणण्यात येणार होते. त्यामुळे बदला घेण्यासाठी बापाने आपल्या मुलाच्या मित्रासोबत आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुस्लीम महिलेचा ड्रेस परिधान करीत पर्समध्ये गावठी पिस्तुल घेवून सोबत ५ जिवंत काडतूस घेत एका मंदिरावर तो बसला व त्याच ठिकाणी त्याची चूक पोलिसांनी लक्षात घेतली व त्याला ताब्यात घेवून शहर पोलिसात आणले. यावेळी चौकशी दरम्यान त्याने सर्व सत्य सांगण्यास सुरुवात केली.

यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलीस कर्मचारी तेजस मराठे, योगेश इंधाटे, गजानन बडगुजर, उमेश भांडारकर, शहर वाहतूक शाखेचे परमेश्वर जाधव यांनी धाडसी कारवाई करत पथकाने या संशयित आरोपी भूसावळातील पंचशील नगरातील रहिवासी मनोहर आत्माराम सुरळकर(५०) याला अटक करीत असतांना झटापटीत एक इसम फरार होण्यात यशस्वी झाला आहे. आपण आपल्या मुलाचा बदला घेण्यासाठी येथे आलो असल्याची कबुली मनोहरने दिली आहे. शहर पोलिसांच्या पथकामुळे त्याचा डाव उधळून लावण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस निरीक्षक ठाकूरवाड यांनी शहर पोलीस ठाण्यात येवून चौकशीला सुरूवात केली आहे. मात्र आज पोलिसांच्या सतर्कतेने न्यायालयात मोठा अनर्थ होण्यापासून टळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.