चाळीसगाव : दुचाकी व रीक्षा चोरी करणार्या चोरट्याना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. गणेश जयराम चव्हाण (लोणजे, ता.चाळीसगाव) व शेख फारुख उर्फ लावारीश शेख गफ्फार (52, अब्दुल खालीक नगर, सर्वे नं. 42, प्लॉट नं.33 नया ईस्लामपुरा, मालेगाव) अशी अनुक्रमे दुचाकी व रीक्षा चोरी करणार्यांची नावे आहेत.
तन्वीर शेख (चाळीसगाव) यांची गणेश कॉम्पलेक्स परीसरातून 49 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरताना 23 रोजी दोन संशयित आढळले होते तर नागरीकांची गर्दी होताच एक संशयीत पसार झाला तर चाळीसगाव पोलिसांना माहिती कळताच नाईक दीपक पाटील, महेंद्र पाटील, अजय पाटील, अमोल भोसले, शरद पाटील यांनी धाव घेतल्यानंतर एकनाथ चव्हाण (लोंजे, ता.चाळीसगाव) यास ताब्यात घेण्यात आले व त्याने या गुन्ह्यात साथीदार गणेश जयराम चव्हाण असल्याची माहिती देताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.