चॉपर घेऊन परिसरात दहशत माजविणाऱ्याला अटक

0

जळगाव : चॉपर घेऊन परिसरात दहशत पसरविण्यासह गुन्ह्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या कल्पेश ऊर्फ बाळा देवीदास शिंपी (२३, रा. शिवाजीनगर हुडको) याला शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शिवाजीनगर हुडको परिसरात करण्यात आली.

कल्पेश शिंपी हा शिवाजीनगर हुडको परिसरात चॉपर घेऊन दहशत पसरविण्यासह गुन्ह्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी शिवाजीनगरात पोहोचले असता ११ ऑक्टोबर रोजी रात्री कल्पेश हा चॉपरसह आढळून आला. त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलिस नाईक किशोर निकुंभ यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कल्पेशविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस नाईक योगेश पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.