महाविद्यालयात ५० लाखांचा गैरव्यवहार, लिपिकावर गुन्हा दाखल

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चोपडा शहरातील श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात तब्बल ५० लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. संशयित सहाय्यक लेखापाल समाधान दत्तात्रय पाटील याने २०१४ ते २०२२ या काळात तब्बल ५० लाख ६७ हजार ८९३ रुपयांचा गैरव्यवहार करून संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय नारायण बोरसे (वय ५३, रा. परीस पार्क, चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,  श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय (चोपडा) या ठिकाणी लिपिक (असिस्टंट अकाउंटंट) म्हणून काम करणारे समाधान दत्तात्रय पाटील यांनी २०१४ ते २०२२ दरम्यान संस्थेत विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती असलेला डाटा, त्यांच्याकडून घेतलेली फी, याची माहिती ठेवण्यासाठी वापरात येण्यात असलेले सॉफ्टवेअर, स्वतःच्या नावाचा यूजर आयडी, पासवर्ड तसेच सुभाष यादवराव पाटील, पी. ए. देशमुख आणि संजय नरेंद्र कुलकर्णी यांचा एसएमके यूजर आयडी पासवर्डचा दुरुपयोग करून २ हजार ९४३ विद्यार्थ्यांकडून फी म्हणून पैसे घेऊन त्यांची स्वाक्षरी करून पैसे घेतल्याची पावती दिली.

मात्र त्यांच्या कॅशबुकमध्ये नोंद न करता ५० लाख ६७ हजार ८९७ रुपयांचा गैरव्यवहार करून संस्थेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी समाधान पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष चव्हाण तपास करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.