५० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

0

चोपडा :– येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन कॉलेजमधील सहाय्यक लेखापाल याने ५० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामिन मिळावा म्हणून संबंधित सहाय्यक लेखापाल याने अमळनेर येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे,

येथील शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन तालुक्यातील भाई येथील समाधान दत्तात्रय पाटील हा सहाय्यक लेखापाल होता. त्याने कॉलेजमध्ये ५० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात २७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून समाधान पाटील याने अमळनेर येथील भाग न्यायालयात १२ रोजी अर्ज दाखल केला होता. मात्र, भाग न्यायालयातील न्यायाधीशांनी समाधान पाटील याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे

 

. दरम्यान, शहरातील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित तंत्रनिकेतनमध्ये समाधान पाटील हा सहाय्यक लेखापाल म्हणून नोकरीस होता. त्याने गत ८ वर्षात वेळोवेळी संगणकाच्या सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीमधून ५० लाख रुपयांच अपहार केल्याची फिर्याद प्राचार्य व्ही. एन. बोरसे यांनी दाखल केली होती.

सन २०१४ ते २०२२ या काळात पॉलिटेक्निक कॉलेजमधील सॉफ्टवेअरमध्ये स्वतःच्या नावाचा युजर आयडीसह पी. ए. देशमुख, सुभाष यादवराव पाटील आणि संजय नरेंद्र कुळकर्णी यांच्या एसएमके यूजर आयडी, पासवर्डचा दुरुपयोग करून वेळोवेळी विद्यार्थ्यांनी भरलेली फी हडप केली आहे. तर २ हजार ९४३ विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक फी भरल्याबाबत त्यांना स्वाक्षरीसह पावती दिली होती. मात्र, त्याची कॅशबुकमध्ये नोंद न करता परस्पर स्वतःच्या हितासाठी हे पैसे त्याने वापरले आहे. त्यामुळे ५० लाख ६७ हजार ८९७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात कलम ४०८, ४२० अन्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करत आहेत. तर संशयित समाधान पाटील याने १२ जानेवारीला अमळनेर येथील भाग न्यायालयात न्यायाधीशांसमोर अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. हा अर्ज न्यायाधीशांनी फेटाळला आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अॅड. बागुल यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.