खाद्यसंस्कृती: पींडी छोले – भटुरे

0

लोकशाही विशेष लेख

 

पंजाबची लाजवाब पेशकश, ओरिजनल अमृतसरी पींडी छोले खायचे असतील तर आपल्याला पंजाब मध्येच जावं लागतं, जसं की इडली सांबार खायला उडपी रेस्टॉरंट मध्ये जावं लागतं तसं. पण अगदी जशीच्या तशी चव आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो. आता विकेंडला शाकाहारी जेवणासाठी बाहेर ढाब्यावर जायची काही आवश्यकता नाही, घरीच मस्त बेत बनवा अमृतसरी पींडी छोले – भटूरेचा. चला तर मग लागा तयारीला..

छोले मसाला:

१ चमचा जिरे, १ च. धणे, ४ मिरे, ४ लवंग, १ मसाला वेलची, १ स्टार फुल, २ वेलची,१ तुकडा दालचिनी, २ तमालपत्र, १ लाल मिरची,१ च. आमचूर पावडर, १/२ च. हळद, १ च. गरम मसाला पावडर, मीठ चवीनुसार

फोडणीसाठी मसाला:

ग्रीन चटणी वाटण: ४ चमचे
पुदीना १ वाटी, १ वाटी कोथिंबीर, ४ मिरची १ तुकडा आलं,१ चमचा डाळिंब दाणे, १ चमचा चिंच चटणी,

बटाटा काप: (सर्व्ह करताना छोलेवर घालावे)
१/२ चमचा बटर, १ च. जिरे, हिंग, कोथिंबीर, २ बटाटे

कृती:

१. प्रथम छोले उकडून घेताना त्यामध्ये एक पुरचुंडी बांधून घालावी. त्या पुरचुंडी मध्ये १ चमचा चहा पावडर, ४ मिरी, ४ लवंगा, २ वेलची घालून ती पुरचुंडी छोले शिजवताना त्यामध्ये घालणे.

२. एक वाटी छोले २ ते ३ तास भिजवून त्यामध्ये १ पेला पाणी आणि पुरचुंडी घालून तीन शिट्टी देऊन छोले मऊ शिजवून घ्यावे.

३. फोडणीसाठी बटर १ चमचा घालून जिरे फोडणी देऊन ग्रीन वाटण घालून परतवून घेणे, त्यानंतर तयार केलेला छोले मसाला ४ चमचे घालून परतवून घेणे.

४. आता त्यामध्ये छोले टाकून १/२ पेला पाणी घालून चांगले शिजवून घ्यावे.

५. छोले शिजवताना वरतून तीन ते चार मिरच्या व आल्याचे पातळ लांबट काप घालून चांगले एकजीव करावे.

६. एका साईडला बटाट्याचे समान काप करून तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणे व त्यावर छोले मसाला व मीठ घालुन ठेवून द्यावे.

भटूरे:

साहित्य:

१/२ वाटी रवा, १ चमचा तेल,१/२ वाटी दही, १/३ सोडा, २ पेले गव्हाचे पीठ, तळण्यासाठी तेल

कृती:

१) २ पेले गव्हाचे पीठ घेऊन त्यात मीठ, सोडा, तेल आणि दही घालून कणिक मऊ अशी मळून घ्यावी.

२) १५ ते २० मिनिटे चांगली मऊसर होण्यासाठी ठेवून द्यावी.

३) आता भटूरे लांबट आकारात लाटून तळून घ्यावे. तयार आपले गरमागरम भटूरे.

४) छोले – भटूरे सर्व्ह करताना थोडे छोले व त्यावर तळलेले मसाला बटाटे घालून गरमागरम भटूरे सोबत खायला द्यावे.

अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे.
पत्रकार/फुड ब्लॉगर
९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.