जी.एच.रायसोनी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची सुरुवात: प्रा. डॉ. संजय शेखावत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असून स्वायत्त जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात यावर्षापासूनच मेजर व मायनर प्रोग्राम, अॅकड्मिक बँक ऑफ क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन अॅप्रोच आदीची सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० च्या दिशेने आमच्या महाविद्यालयाच्या मार्गक्रमण सुरु आहे. तसेच या धोरणामुळे शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन सर्वांचेच उत्तरदायीत्व वाढणार असून थोडक्यात तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधन आणि प्रयोगशिलतेद्वारे देशाला प्रगती पथावर नेण्याचे उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाद्वारे साध्य केले जाणार असल्याचे, जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी “अभियांत्रिकी प्रथम वर्ष” विद्यार्थ्यांच्या स्वागत सोहळ्याप्रसंगी सांगितले.

ता. १७ गुरुवार रोजी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या सर्व विभागाच्या विध्यार्थ्यांसाठी ‘प्रारंभ’ या शीर्षकाखाली स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, अभियांत्रिकी प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर, सिव्हील विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार, मॅकेनिकल विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील, कॉम्प्यूटर विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील, इलेक्ट्रीकल विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील, इलेक्ट्रॉनिक विभागप्रमुख प्रा. डॉ. बिपासा पात्रा हे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात प्रा. डॉ. संजय शेखावत पुढे म्हणाले की, कोणतही यश सहजाजसहजी मिळत नाही. या विविध क्लबमुळे विध्यार्थ्यामध्ये संवाद कौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्व गुण, टीमवर्क स्किल हे सारे कौशल्य आत्मसात होण्यास मदत होऊन ही यशस्वी करिअरची एक उत्तम सुरवात आहे.

उत्तम कौशल्य आत्मसात करून तुम्ही तुमचे करिअर उच्च स्तरावर नेऊ शकता व आजच्या काळात असे कौशल्य संपन्न युवकांची इंडस्ट्रीला गरज असून विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट सदैव कार्यतत्पर आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. यानंतर कार्यक्रमात नुकताच प्रवेश घेतलेल्या सर्व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन तसेच त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचे स्वागत करण्यात आले व यावेळी विद्यार्थ्यांना प्राध्यापक वर्ग व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची माहिती देत महाविद्यालयातील मुबलक सुविधा, हॉबी क्लब, बस, लायब्ररी, मैदान, ग्रंथालय, जिम याबद्दलची देखील माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची समन्वयक म्हणून प्रा. प्रिया टेकवानी व प्रा. स्वाती बाविस्कर यांनी जबाबदारी पार पाडली. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.