चिवास महिला मंडळ आणि स्वरदा गृपतर्फे आयोजित भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

चिवास महिला मंडळ आणि स्वरदा गृप नेवे समाज यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच राज्यस्तरीय खुली भजन स्पर्धा  ब्राह्मण सभेत  घेण्यात आली त्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून अकोला, रावेर, भडगाव, भुसावळ, खिरोदा, तरसोद, जळगाव अशा अनेक ठिकाणच्या सुमारे २३ भजनी मंडळांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे यात पुरुष भजनी मंडळांनी देखील सहभाग घेतला होता. या स्पर्धा नवजीवन प्लस सुपर शाप आणि वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या प्रायोजकत्वा खाली घेण्यात आल्या.

सकाळी स्पर्धेचे उद्घाटन नगरसेविका उज्वला बेंडाळे, दिपीका चांदोरकर, शांता वाणी, चिवास महिला मंडळ अध्यक्ष अनघा खारुळ, स्वरदा गृपच्या अध्यक्ष सुचिता नेवे यांच्या हस्ते झाले.

दिवसभर ब्राह्मण सभा परिसर भक्तिमय वातावरणाने दणदणून गेला होता. यात प्रथम पारितोषिक स्वरार्चना भजनी मंडळ अकोला यांनी पटकाविले, तर द्वितीय स्वरसंध्या भजनी मंडळ जळगाव, तृतीय सुरेल सखी मंडळ जळगाव, उत्तेजनार्थ शिंपी समाज गोणाई महिला मंडळ जळगाव आणि संत श्री गजानन महाराज भजनी मंडळ यांनी पटकाविले. गोकुळ भजनी मंडळ भुसावळ यांना कै.नानासाहेब प्रभाकर अण्णाजी खारुळ यांच्या स्मरणार्थ सुप्रभात ज्वेलर्स जळगाव यांच्या तर्फे विशेष पुरस्कार देण्यात आला. तसेच सुरू सप्त भजनी मंडळ जळगाव यांना प्रकाश वाणी सुप्रभात ज्वेलर्स तर्फे विशेष पुरस्कार देण्यात आला.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून दुष्यंत जोशी, संपदा छापेकर, अक्षय गजभिये, यांनी काम पाहिले. यावेळी संपदा छापेकर, दिपीका चांदोरकर यांनी मार्गदर्शन केले. तर अनघा खारुळ यांनी चिवास महिला मंडळाच्या कार्याची तर सुचिता नेवे यांनी स्वरदा गृपच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संगिता अजनाडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली वाणी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्चना वाणी, वंदना गडे, भाग्यश्री नेरकर, संजना नेवे, छाया गडे, उज्वला वाणी, मनीषा अकोले, मालती वाणी आणि चिवास महिला मंडळाच्या व स्वरदा गृपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.