स्व.राधिकाची हत्या प्रकरणाच्या चौकशी साठी चिखली शहर कडकडीत बंद

0

चिखली, लोकशाही न्यूज नेटवर्क

दि.१५ मे रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्व राधिकाच्या हत्येचा तपास व हत्याऱ्यास फाशीच्या शिक्षेची मागणी यासाठी चिखलीवासीयांनी एकत्रित येत संपूर्ण शहरातून रॅली काढून चिखली बंद चे आव्हान केले असता चिखली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. स्व. राधिका विलास इंगळे या चिमुकल्या मुलीची हत्या करणाऱ्या नराधमास त्वरित अटक करून फारची शिक्षा देण्याची सर्वपक्षीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्रित मागणी करण्यात आली आहे. निवेदनात त्यांनी चिखली तालुक्यातील रोहडा येथील तपोवन संस्थान परिसरातील एका लग्न समारंभातून १२ मे रोजी दुपारी ११ वाजता हरवलेल्या राधिका इंगळे हिचा १३ मे रोजी दुपारी ३ वाजता तपोवन देवी परिसरात मृत देह आढळला असून प्रथम दर्शनी त्या बालीकेची निर्घुणपणे हत्या केल्याचे दिसत आहे. या अंत्यत दुदैवी घटने बाबत चिखली परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असुन नागरीकांमध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे.

चिखली वासीयांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे विनंती व्यक्त करण्यात आली की प्रशासनाने याबाबत त्वरित कार्यवाही करुण दोषी नराधमास त्वरीत अटक करुण फाशिची शिक्षा दयावी अशी मागणी चिखली करांच्या वतीने स्थानिक पोलीस स्टेशनचे ठाणेदार गावंडे साहेब यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी साहेब, मा. पोलिस अधिक्षक साहेब, मा. तहसीलदार साहेब चिखली यांना देण्यात आले. कपिल खेडेकर यांनी चिखली बंदचे सर्व चिखलीकरांना भावनिक आव्हान केले होते या निवेदनावर कपिल खेडेकर, प्रशांत ढोरे पाटील, डॉ सतेंद्र भुसारी, बंडू बरबडे, विनायक सरनाईक, दत्ता सुसर, शिवाजी बाप्पू देशमुख, शैलेश गोंधने, श्रीराम झोरे, आदींच्या निवेदनावर सह्या आहेत,

Leave A Reply

Your email address will not be published.