डॉन ३ येणार ? काय म्हणाले निर्माते रितेश सिधवानी…

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

डॉन या सीरिजचे सर्वचजण चाहते आहे. डॉन चित्रपटाने चाहत्यांना वेड तर लावलेच सोबतच डॉन च्या दुसऱ्या भागात सुद्धा एक वेगळाच ऍक्शन सिन आणि कथेमुळे ह्या चित्रपटाला देखील चाहत्यांनी डोक्यावर धरले होते. यानंतर ‘डॉन ३’ (Don 3) कधी येणार अशी सतत विचारणा होत होती. आता याबद्दल अपडेट समोर आलं आहे. नुकतंच सिनेमाचे निर्माता रितेश सिधवानी (Ritesh Sidhwani) यांनी डॉन ३ बाबत नवी माहिती दिली आहे.

निर्माते रितेश सिधवानी एका मुलाखतीत म्हणाले,”फरहान सध्या डॉन ३ च्या स्क्रीप्टवर काम करत आहे. मात्र मला फिल्मच्या कथेबद्दल काहीच कल्पना नाही.जोपर्यंत फरहानचं लिखाण संपत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करणार नाही. सध्या तो स्क्रीप्ट पूर्ण करण्यात व्यस्त आहे. आम्ही सुद्धा डॉन ३ साठी आतुर आहोत.तर डॉन ३ बद्दल पहिल्यांदाच ही अधिकृत माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाहतेही भलतेच खूश आहेत. मात्र आता एकच प्रश्न आहे की डॉन ३ मध्ये ‘जंगली बिल्ली’ प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) दिसणार का? डॉन २ नंतर प्रियंका आणि शाहरुखच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांनंतर दोघांनीही पुन्हा एकत्र काम केलं नाही. आता डॉन ३ साठी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.