रयतची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बोगस दिव्यांग शिक्षकांच्या शारीरिक पडताळणीची मागणी

0

चिखली, लोकशाही न्यूज नेटवर्क

फेब्रुवारी रोजी रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाल्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र जोडून बदली प्रक्रियेत दिव्यांगानमधून बदलीचा लाभ घेणाऱ्या सर्व कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांची जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कडून शारीरिक पडताळणी करणे तसेच बीड जिल्हापरिषद धर्तीवर बोगस दिव्यांग धारकांवर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात त्यांनी बुलडाणा जिल्हा परिषदेने जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये दिव्यांगा मधून बदलीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांची वैद्यकीय दृष्टीने सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले परंतु सदर दिव्यांगांची जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कडून शारिरीक पडताळणी करूनच प्राप्त झालेले प्रमाणपत्र स्वीकारावे असे म्हटले आहे. आजरोजी बहुतांश बोगस दिव्यांग धारकांनी जिल्हांतर्गत बदली, इनकम टॅक्स साठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जोडून लाभ घेत आहेत. अशा सर्वच जि.प. सेवेतील सर्व कर्मचारी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी यांची मेडीकल बोर्ड समोर शारीरिक पडताळणी करण्यात यावी अशी मागणी रयत क्रांती पक्षा कडून वेळोवेळी होत असून आधिकरी व दिव्यांग नेते यांची मिलीभगत असल्याकारणाने त्याला हवा तसा प्रतिसाद आधिच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेला नाही.

जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात शिक्षणाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांनीच जर असे बोगस चुकीचे कामे करून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले असतील तर ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आलेले आहे. कारण जर ते दिव्यांग शिक्षक असतील तर वर्षानुवर्ष ते एकाच ठिकाणी कार्यरत राहतात व विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान करतात त्यामुळे सामान्य शिक्षक जे शिक्षक खरोखर दिव्यांग असणाऱ्या शिक्षक बांधवांवर बदली प्रक्रियेत अन्याय होतो तसेच जे शिक्षक सेवाजेष्ठ असतात त्यांना बदली प्रक्रियेत खो बसून त्यांना बोगस दिव्यांग शिक्षकांमुळे इतरत्र बदलून जावे लागते.

कोणतेही कारण नसतांना दिव्यांग संवर्ग (1) मधून कोणालाही खो देतात व स्वतः सोयीची जागा मिळवून इतर शिक्षकांवर अन्याय करत असतात, रयत क्रांती पक्षामार्फत माजी ‘मंत्री सदाभाऊ खोत’ यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला असतांना देखील न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे कारण समोर करून बुलढाणा जिल्हा परिषद प्रशासनाने वेळकाढू धोरण घेतलेले होते, आजपर्यंत बोगस दिव्यांग शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांची शारीरिक पडताळणी करावी म्हणून बुलढाणा जि.प ला वारंवार याबाबतचे निवेदने देऊनही कुठल्याही प्रकारची ठोस अशी कार्यवाही झालेली नाही. परंतू बीड जि.प चे सिईओ ‘अजित पवार’ यांनी केलेल्या कारवाईच्या धर्तीवर बुलढाणा जि.प च्या सि.ई.ओ भाग्यश्री विसपूते यांनी देखील कारवाई करावी अशी मागणी रयत क्रांती पक्षाच्या वतीने करत आली आहे.

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सि.ई.ओ.भाग्यश्री सातपुते यांची प्रशासनावरील पकड पाहता त्या निश्चितच दिव्यांग शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी यांना शारीरिक पडताळणीसाठी आदेश देतील जेणेकरून जि.प अंतर्गत खरोखर दिव्यांग असणाऱ्या दिव्यागांना न्याय मिळेल अशी अपेक्षा रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.