राज्यात किमान तापमानात वाढ….

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात कधी थंडी तर कधी ऊन असा वातावरणाचा खेळ सातत्याने चालत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतलेली थंडी हळूहळू कमी होऊ लागली आहे.राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. गारठा कमी झाला आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कमाल तापमान 35 अंशांच्या वर

राज्यात कमाल तापमानाचा पारादेखील 35 अंशांच्या वर गेला आहे. विशेष म्हणजे राज्यात कमाल आणि किमान तापमानात तफावत वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात आणखी दोन दिवस थंडी कायम राहील. त्यानंतर तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम

राज्यात किमान तापमानात वाढ होत असली तरी उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. नाशिकमधील निफाड येथे राज्यातील निचांकी 8.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कालपर्यंत औरंगाबाद, धुळे, जळगाव या जिल्ह्यांत पारा 10 अंशांच्या खाली होता. मात्र, आज जळगाव येथे पारा 10 अंशांच्यावर गेला आहे. राज्याच्या उर्वरित भागातही बहुतांश ठिकाणी किमान तापमान 12 अंशांच्या वर गेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.