रितेश देशमुख साकारणार ‘ही’ महत्वपूर्ण भूमिका, वाचा सविस्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

काही वर्षांपूर्वी एक मोठी घोषणा झाली त्यामुळे सर्वांना आनंद झाला. ही गोष्टीना म्हणजे छत्रपती महाराजांवरील सिनेमा.  अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Desakhmukh) सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमिकेत बघायला मिळणार अशी चर्चा रंगली होती. सिनेमाची घोषणा होऊन तब्बल २ वर्षे झाली आहे. पण आता अभिनेता रितेश देशमुख महाराजांची भूमिका साकारेल यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

पण सिनेमाची नंतर कुठेही चर्चा बघायला मिळाली नाही. पण आता जिनिलिया देशमुखने (Genelia Deshmukh) छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा तयार होणार आणि त्यात रितेश मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले आहे. रितेशने २०२० मध्ये या चित्रपटाबद्दल ट्रायोलॉजी बनविण्याची घोषणा केली होती. पत्नी जिनिलिया ने दुजोरा देत सांगितले की, “हा चित्रपट रितेशच्या खूप जवळ आहे. या प्रकल्पासाठी तो आपले जीवन समर्पित करेल. हा प्रकल्प घाईगडबडीत करण्याचा प्रश्नच येत नाही.” हा चित्रपट भिनेत्याच्या प्रॉडक्शन हाऊस ‘मुंबई फिल्म कंपनी’च्या बॅनरखाली बनवला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.