वडील रागवले म्हणून सातवीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

0

संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभ्यास करण्यावरून वडील रागावल्यामुळे सातवीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना संभाजीनगराच्या औरंगपुरा भागात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून मुले टोकाचे पाऊल उचलत आहे. अभ्यासावरुन रागावल्याने, मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुले मुली थेट आत्महत्या करत आहे. त्यामुळे पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशीच एक हादरवुन टाकणारी घटना घडली आहे.

अभ्यास करण्यावरून वडील रागावल्याने मुलीने आत्महत्या केल्याची घटना औरंगपुरा भागातील भागातील भडाई गल्लीत मंगळवारी (१७, ऑक्टोंबर) रोजी ही घटना घडली. प्रणवी वेळेवर अभ्यास करत नसल्याने शिक्षकांनी तशी नोंद तिच्या नोंदवहीमध्ये केली होती. ती बघून वडिलांनी होमवर्क वेळेवर करत जा.. म्हणून रागावले आणि त्यानंतर ते कामावर निघून गेले. हाच राग डोक्यात घालून वडिल गेल्यानंतर घराच्या लाकडी दांड्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेत प्रणवीने आपली जीवन यात्रा संपवली आहे.

बराच वेळेपासून ती खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने, आजोबांनी दरवाजा तोडला आणि आज प्रवेश केला असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. क्रांती चौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.