बुद्धिबळ निवड स्पर्धेत मुलांमध्ये क्षितिज वारके प्रथम तर मुलींमध्येऋतुजा बालपांडे प्रथम

0

जळगाव ;- – जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि १५ ऑक्टोंबर रविवार रोजी कांताई सभागृह येथे झालेल्या तेरा वर्षा आतील जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा जैन स्पोर्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीचा क्षितिज वारके यांनी सात पैकी साडेसहा गुण घेत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तर दुसरा क्रमांक पाचोरा येथील आर्यकुमार शेवाळकर साडेपाच गुण घेत द्वितीय क्रमांक मिळवला. तर तिसऱ्या स्थानी जळगावचा दुर्वेश कोळी हा राहिला. तर मुलींच्या गटात पाचोर्‍याची ऋतुजा बालपांडे पाच गुणांसह प्रथम आली तर द्वितीय स्थान जळगावची अनुभूती स्कूल ची विद्यार्थिनी विद्या बागुल द्वितीय स्थानी राहिली. स्पर्धेत एकूण ४० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता.

एकूण सात फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेतील पहिल्या १० विजेत्या खेळाडूंना जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव श्री नंदलाल गादिया खजिनदार अरविंद देशपांडे सहसचिव संजय पाटील नथू सोमवंशी यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. विजेते खेळाडू खालील प्रमाणे क्षितिज वारके, आर्यकुमार शेवाळकर पाचोरा, दुर्वेश कोळी, आरुष सरोदे,शाश्वत संघवी, सम्यक निकम जामनेर, गौरव बोरसे, गौरव जोशी, पार्थ नानकर,कृतार्थ शहा तर मुलींमध्ये ऋतुजा बालपांडे, विद्या बागुल, चेतना सोनवणे पाचोरा, गार्गी राजपूत चाळीसगाव तर उत्तेजनार्थ म्हणून स्पर्धेतील लहान खेळाडू अनुश्री पाटील वीर आहूजा यांना गौरवण्यात आले.
स्पर्धेतील पहिल्या दोन मुले व मुली यांची निवडनाशिक येथे दि २० ते २२ ऑक्टोंबर होणाऱ्या होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली.स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रवीण ठाकरे, परेश देशपांडे, नथू सोमवंशी, पवन अभिषेक जाधव यांनी काम पाहिले. विजयी खेळाडूंचे अभिनंदन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अतुल भाऊ जैन यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.