चेन्नईत मिचौंग चक्रीवादळामुळे सर्वत्र हाहाकार, जनजीवन विस्कळीत

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

चेन्नईत महिला काही दिवसांपूर्वी कोसळत असलेल्या पावसामुळे शहरात पूरग्रस्तस्थिती निर्माण झाली आहे. शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या चेन्नईत इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. २०१५ मध्ये ४ डिसेंबराच्याच दिवशी अल निनोमुळे झालेल्या अतिवृष्टीने शहरात पूर आला होता. आज मिचौंग चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे, शहरात ८ वर्षांपूर्वी जे घडलं तसाच पुन्हा होतांना दिसत आहे.

शहराच्या अनेक भागातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पुराचा सार्वजनिक बसेसवर देखील परिणाम होत आहे. उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या दोन्ही हवाई आणि रेल्वे सेवा ठप्प झाल्या आहे.

शहराच्या अनेक भागातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पुराचा सार्वजनिक बससेवेवर देखील वाईट परिणाम झाला आहे. उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या दोन्ही हवाई आणि रेल्वे सेवा ठप्प झाल्या आहेत. सुल्लुरपेटा स्थानकाजवळील पुल क्रमांक १६७ वर पाणी पातळी धोक्याच्या चिन्हावर पोहोचली आहे. शहराच्या अनेक भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे.

चेन्नईच्या कनाथूर भागात वादळ आणि पावसामुळे भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे अलंदूरमधील थिलाई गंगा नगर भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. वडापलानी आणि अरुम्बक्कम भागात पावसामुळे अनेक वाहने पाण्यात बुडाली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.