सोन्याच्या दराने गाठला उच्चांक, पहा आजचे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लग्नसराईच्या हंगामाला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर घसरले होते. मात्र आता  लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दराने प्रचंड विक्रम मोडला आहे.

सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाली. लग्नसराईत सोन्या-चांदीच्या भावाला मागणी असल्यामुळे दोन्ही धातूंमध्ये तेजी सत्र सुरु आहे.  मागच्या सहा महिन्यात सोन्याच्या दरात  पतझड पाहायला मिळाली. जागतिक स्तरावरही सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे आज सोन्याच्या भावाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. आज सोन्याच्या भावात ४४० रुपयांनी वाढ झाली.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार, आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,९०० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६४,३५० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही स्थिर आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी  ८०,५०० रुपये मोजावे लागतील.

२४ कॅरेटनुसार आजचा भाव 

मुंबई – ६४,२०० रुपये

पुणे – ६४,२०० रुपये

नागपूर – ६४,२०० रुपये

नाशिक – ६४,२३० रुपये

ठाणे – ६४,२०० रुपये

अमरावती – ६४,२०० रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.