मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
रजनीकांत (Rajinikant) आणि कंगना रनौत (Kangana Ranaut) ‘चंद्रमुखी २’ (Chandramukhi 2) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. एवढाच नाही तर, साऊथचा सुप्रसिद्ध अभिनेता राघव लॉरेन्सची (Raghav Lawrence) देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. सोबतच या चित्रपटाविषयी मोठी बातमी समोर येत आहे.
दरम्यान, चित्रपटातील निर्मात्यांनी हळूहळू लूक शेअर करायला सुरुवात केली आहे. चंद्रमुखी २ मधील राघव लॉरेन्सचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचे पोस्टर आज म्हणजेच ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता रिलीज करण्यात आले आहे. रजनीकांत मुख्य भूमिकेत असलेल्या चंद्रमुखी या सुपरहिट तमिळ चित्रपटाचा आगामी सिक्वेल आहे. लॉरेन्सच्या राजेशाही लूकने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.
पी वासू दिग्दर्शित (P Vasu), चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे आणि त्यात वाडीवेलू, राधिका सरथकुमार, लक्ष्मी मेनन आणि इतर महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये अनेक दिग्गज पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेते संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी (MM Keeravani) यांनी दिले आहे. चित्रपटाची निर्मिती लायका प्रॉडक्शनने केली आहे. १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटा कंगना रनौत मुख्य भूमिका साकारतांना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तिची भूमिका कशी असेल याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. कंगना अभिनयासह निर्मती आणि दिग्दर्शन या क्षेत्रात देखील कार्यरत आहे.
`