बसमधून महिलेच्या बॅगेतून २ लाखाचे दागिने लंपास

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेच्या बॅगमधून २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात महिलेने लंपास केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शोभा शिवाजी पाटील (वय ५३, रा. रायगड नगर, सिडको, औरंगाबाद) या १६ एप्रिल रोजी १० ते ११ च्या दरम्यान कामाच्या निमित्ताने भडगाव ते चाळीसगाव दरम्यान बसमध्ये प्रवास करत होते. नगरदेवळा दरम्यान एका अनोळखी महिलेने त्यांच्या बॅगेतून २ लाख ३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

हा सर्व प्रकार चाळीसगाव बसस्थानकात उतरल्यानंतर शोभा पाटील यांच्या लक्षात आला. दरम्यान तात्काळ त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. शोभा पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.