आमदार मंगेश चव्हाणांनी रस्ता मंजूर केल्याने जुनोने गावाला मिळाला न्याय – सरपंच

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव शहरापासून जुनोने गाव हे लांब अंतरावर आहे. शिवाय कन्नड घाटातून गावाकडे जाणारा वनविभागाच्या हद्दीतून जाणारा जवळपास 3 कि मी रस्ता हा अत्यंत खराब होता . त्यामुळे ग्रामस्थांना चाळीसगाव येणे जाणे कठीण होत होते . मात्र आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 40 किमी च्या 17 रस्त्यांना मंजुरी मिळवली . त्यात जुनोने गावाच्या रस्त्याचा समावेश केल्याने आता जुनोने गावातील ग्रामस्थांना आता चाळीसगाव येणे जाणे सोयीचे होणार असल्याने सरपंच गोरख राठोड यांनी आ. मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहे.

चाळीसगावपासून कन्नड घाट दूर असला तरी घाट चढून जंगलातून वनविभागाच्या हद्दीतून जुनोने गाव 5 किमी आहे. त्यात 3 किमी रस्ता अत्यंत खराब स्थितीत होता आमदार मंगेशदादा चव्हाण यांना याबाबत कल्पना दिल्यावर त्यांनी लागलीच वनाविभागाशी पाठपुरावा करून 3 किमी रस्त्याला मंजुरी मिळवून निधी प्राप्त करून दिला असल्याचे सरपंच गोरख राठोड यांनी सांगितले आहे. . यामुळे आता जुनोने ग्रामस्थांना शासकीय कामे व इतर कामासाठी चाळीसगाव येण्यासाठी सोयीचे होणार असल्याचे त्यांनी सांगितले..

Leave A Reply

Your email address will not be published.