चाळीसगावात विविध ठिकाणी सट्टा -जुगार अड्ड्यांवर छापा ; ७ जणांविरुद्ध गुन्हा

0

चाळीसगाव:;– शहरात अवैधरित्या सट्टा आणि जुगार खेळताना ७ जणांना चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आल्याने जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत . चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चोरून लपून चालविले जात असलेले अवैध जुगार क्लब,सट्टा, गावठी दारू, गांजा अशा अवैध धंद्याची बिमोड करण्यासाठी ऍक्शन वोश आऊट हाती घेतले आहे

चाऴीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध जुगार खेळ खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या असलेबाबत माहीती पोलीस स्टेशनला प्राप्त झालेवरुन
चाळीसगांव शहरातील अवैध धंदे समुळ उच्चाटन या विशेष मोहीम दरम्यान १३ रोजी अवैध धंदे चालविणारे सकाळी 11वा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोहेकॉ, पंढरीनाथ पवार, पोना,भटु पाटील, पोकॉ, भरत गोराळकर यांच्या पथकाने शहरात पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहिती आधारे इसम नामे मुकेश डिंगबर पाटील रा.गणेश रोड, संजय हार्डवेअरच्या बाजुला, चाळीसगांव हा विना परवाना गैरकायदा लोकांकडुन सट्‌ट्याचे आकडे व रोख पैसे स्विकारुन कल्याण मटका नावाचा सट्टा जुगारचा खेळ खेळतांना व खेळविताना आढळून आला . त्याच्याकडून एकुण 1600 रु. किं.च्या मुद्देमाल मिळून आला.त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच पोहेकॉ/ राहुल सोनवणे ,पोनाभुषण पाटील, पोनामहेंद्र पाटील, पोकॉ/भरत गोराळकर, पोकॉसमाधान पाटील, पोकॉ/आशुतोष सोनवणे, पोकॉ पवन पाटील असे शहरात पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहिती आधारे चाळीसगाव चाळीसगाव शहरातील हुडको भागातील नगरपालीका मंगल कार्यालय जवळील ओपन पत्राचे शेडमध्ये सैय्यद कय्युम सैय्यद कादरी वय-54 वर्षे रा. हुडको महादेव मंदीर जवळ चाळीसगाव , लतीप खान रशीद खान वय-34 रा.हुडको ईस्लामपुरा चाळीसगाव,पिंटु माधवराव कुमावत वय-34 वर्षे रा. प्रभातगल्ली चाळीसगाव ,अक्रम खान जुम्मा खान वय-35 वर्षे रा. नवागाव चाळीसगाव, नवल सुदाम फासगे वय-32 वर्षे रा. नागदरोड झोपडपट्टी,आयुब खान जाबीर खान वय-36 रा.हुडको कॉलनि मदीना मस्जीद जवळ रा.टाकळी प्र.चा.ता.चाळीसगांव हे सर्व जण प्लास्टीक खुर्च्या व लाकडी टेबल लावुन घोळका करुन मध्ये पैसे फेकुन पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना दिसल्याने म्हणुन त्यांचेवर छापा टाकुन त्याना कारवाई करण्यात आली असुन त्यांच्या ताब्यातुन एकुण२९ हजार ६०० रू.रोख रक्कम व दोन पत्याचा कॅट तसेच खुर्च्या व लाकडी टेबल व जुगाराचे साहीत्य अशा मुद्देमालासह मिळुन आले म्हणुन त्याचेवर कारवाई करुन गुन्हा दाखल कऱण्यात आला . तसेच त्यांच्या जवळील एकुण- 22,200/-रूपये जप्त करण्यात आले, अवैध प्रकार शहरात कुठेही चालु असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला नागरिकांनी संपर्क साधावा.असे आवाहन पोलिस निरीक्षकसंदीप पाटील यांनी केले आहे,

हि कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी ,.अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर, मा.सहा.पोलीस अधिक्षकअभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली चाऴीसगाव शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.