ब्रेकिंग : चाळीसगाव येथील माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्या खून प्रकरणातील दोन आरोपीना अटक

0

चाळीसगाव:- चाळीसगाव येथील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचा त्यांच्या कार्यालयात बसलेले असतांना कारमध्ये येवून गोळीबार करून खून करण्यात आला होता.

बाळू मोरे यांच्या संपर्क कार्यालयातील संजय बैसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उद्देश उर्फ गुड्डू शिंदे, सॅम चव्हाण, सचिन गायकवाड,अनिस शेख उर्फ नवा शरीफ शेख, भूपेश सोनवणे, सुमित भोसले, संतोष निकुंभ उर्फ संता पेहलवान या आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या सात आरोपी पैकी अनिस शेख उर्फ नवा शरीफ शेख व सचिन गायकवाड या दोन आरोपींना चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.