दुचाकीने जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू

0

जळगाव : मॉर्निंग वाक करत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने नरेंद्र चून पंढरीनाथ कोळी (वय ४४, ात रा. विदगाव, ता. जळगाव) हे चत गंभीर जखमी झाल्याची घटना गा दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ सा वाजता घडली होती. त्यांच्यावर ार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चत उपचार सुरू असतांना सोमवार दि. च्या १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत ारी मालवली. याप्रकरणी तालुका पु. पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विदगाव येथे नरेंद्र कोळी हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसहवास्तव्याला होते. ते खासगी कंपनीत नोकरी करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. शनिवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे मॉर्निंग वाक करण्यासाठी घराबाहेर पडले.
विदगावजवळील यावलरोडने पायी जात असतांना त्यांनी मागून भरधाव वेगाने येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईबी ०५११) ने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने गावातील ग्रामस्थांच्या मदतीने खासगी वाहनातून जळगावातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.