धूमस्टाईल लांबविली महिलेची मंगलपोत; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरात दिवसेंदिवस मंगलपोत चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत. शहरातील ईश्वर कॉलनी येथे महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रूपये किंमतीची मंगलपोत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धूमस्टाईल लांबवल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

शीतल संजय रोकडे (वय ५२, रा. ईश्वर कॉलनी, जळगाव) ह्या आपल्या कुटुंबियांसह राहतात. बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कामानिमित्ताने त्या घराबाहेर गेल्या होत्या. काम आटोपुन पुन्हा घराकडे परतत असतांना समोरुन भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीवरील दोघांनी शीतल रोकडे यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची मंगलपोत तोडुन नेली.

दरम्यान काही कळण्याच्या आत दुचाकीस्वार दोघे भरधाव वेगाने निघून गेले. त्यानंतर रोकडे यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री १० वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.