दुर्देवी ! बायकोला कार शिकवताना पडले विहिरीत; पत्नीसह चिमुकलीचा मृत्यू

0

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बुलढाण्यामधून (Buldhana) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला कार (Car learning) शिकवत असताना नियंत्रण सुटल्याने कार थेट विहिरीतच जाऊन कोसळली.  या अपघातात मुलगी आणि पत्नीचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना देऊळगाव राजा येथे घडली.

देऊळगाव राजा येथील रामनगरमध्ये राहणारे शिक्षक अमोल मुरकुट हे आपली पत्नी स्वाती मुरकुटला कार शिकवत होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सिद्धी मुरकुट वर्ग पाचवा ही सुद्धा सोबत होती. दरम्यान कार शिकवित असताना चिखली रोडवर जात असताना कार वरील ताबा सुटल्याने कार सरळ विहिरीमध्ये पडली.

या दुर्घटनेत अमोल मुरकुट खिडकीमधून कसेबसे बाहेर आले. मात्र, स्वाती मुरकुट व मुलगी सिद्धी मुरकुट यांचा मात्र पाण्यामध्ये मृत्यू झाला आहे. अमोल मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्वाती मुरकुट व सिद्धी मुरकुट यांचा मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.