खासगी बस पुलावरुन कोसळली; 25 जण जखमी, चौघे गंभीर

0

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क 

खासगी बस पुलावरुन कोसळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना नागपूर पुणे महामार्गावर घडली . या अपघातात  25 प्रवासी जखमी झाले असून चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना मंगळवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास नागपूर पुणे महामार्गावर बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात घडली.

पुण्यावरुन नागपूरच्या दिशेनं निघालेली खासगी बस (क्रमांक एस एच 40, सीएम 6969 ) ही छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावर भरधाव वेगाने जात होती. यावेळी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस मात्रेवाडी परिसरातील पुलावरुन खाली कोसळली. त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 25 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने या अपघातात अद्याप जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातातील 4 प्रवाशांची प्रकृती गंभीर असून जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती बदनापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुदाम भागवत यांनी दिली.

जखमी झालेल्या प्रवाशांना जालना इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यात अमन कुमार (19 मध्यप्रदेश), अनिता इंगोले (35), शाहबाज खान, रवींद्र राजे (33), रितेश चंदेल (23), पराग शिंगणे (42 नागपूर), निकेल मानिजे (23 वर्धा), किरण मांटुळे (38 यवतमाळ), संभाजी सासणे (32 यवतमाळ), मधुकर पोहरे (40 अमरावती), गणेश भिसे (37 यवतमाळ), मोहम्मद सैफुद्दीन (30 ), सागर उपाय्या (19 मध्य प्रदेश), वर्षा नागरवाडे (40 यवतमाळ), शुभम हत्तीमारे (27 गोंदिया) या 15 जखमींवर जालना येथील शासकीय रूग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयातील डॉ. उमेश जाधव, डॉ. अनुराधा जाधव व त्यांची टीम उपचार करत आहे. तर इतर प्रवाशांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.