जळगाव-लोहारा-पाचोरा बस पुन्हा आज पासून सुरू होणार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथे जाण्यासाठी सकाळी बस होती, पण परत येण्यासाठी खाजगी वाहनांशिवाय पर्याय नव्हता. यामुळे जळगाव लोहारा येण्यासाठी बस सुरू करा. अशी मागणी निलेश चौधरी, पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत, दमवताबाई सुर्वे वाचनाचे अध्यक्ष बापू पाटील अन्य यांनी केली होती. याबाबत महामंडळाकडून प्रतिसाद न मिळाल्याने, स्मरणपत्र ही दिली बस सुरू न झाल्याने २४ जुलै रोजी लोहारा-पाचोरा चौफुलीवर बस सुरू करण्यासाठी रस्ता रोको करण्यात आले होते. यावेळी संबंधित अधिकारी यांनी रास्ता रोको यांच्याशी संवाद साधून २ ऑगस्ट रोजी जळगाव येथून साडेचार वाजता निघणारी लोहारा मार्गे पाचोरा ही बस सुरू करण्यात आली होती. पण पुन्हा ती दत्तजयंती पासून बंद झाली.

यामुळे शासनाने महिलांना दिलेले ५० टक्के आरक्षण सोबतच कुटुंबीय यांना प्रवासासाठी त्रास सहन करावा लागला. जवळपास एक महिन्याचा कालावधी निघूनही संबंधित महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या मार्गावरची अखेरची बस सुरू केलेली नाही. याबाबत स्थानिक दैनिक लोकशाहीचे प्रतिनिधी हर्षल राजपूत यांनी वाहतूक निरीक्षक प्रयाग पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ही बस सोमवारपासून पूर्वत सुरू करण्यात येणार असल्याचे दुजोरा दिला. तरी प्रवाशांनी बससेवेचा लाभ घ्यावा असे आव्हान यानिमित्ताने करण्यात आलेले आहे.

वाहतूक निरीक्षक- प्रयाग पाटील
शिवपुराण कार्यक्रमामुळे काही मार्गाच्या बसेस तिकडे पाठवाव्या लागल्यात त्यात शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली गेली. काही अपरिहार्य कारणामुळे बसेस संख्या कमी झाल्या होत्या, तरीही जळगाव-लोहारा-पाचोरा ही बस सोमवारपासून पूर्ववत सुरू केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.