सैन्य दलात असलेल्या जवानाच्या पत्नीचा विहिरीत पडून मृत्यू

0

छत्रपती संभाजी नगर ;-कन्नड तालुक्यातल्या मोहरा येथे एका २२ वर्षीय गर्भवती महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. पल्लवी दिनेश गाडेकर असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडून पहळहळ व्यक्त होत आहे.

मृत पल्लवी यांचे पती दिनेश गाडेकर हे सैन्यदलात आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांचे कुटुंब हे मोहरा शिवारात डोंगराच्या पायथ्याशी राहत होते. पल्लवी ९ महिन्यांच्या गर्भवती होत्या.शनिवारी (२७ जानेवारी) दुपारच्या सुमारास पल्लवी घराबाहेर पडल्या. मात्र, खूप वेळ होऊनही त्या परतल्या नाही. कुटुंबियांनी शोधाशोध घेतली असता, त्यांचा मृतदेह राजेंद्र गाडेकर यांच्या गट नंबर १५० मधील विहिरीत मृतदेह आढळून आला.

Leave A Reply

Your email address will not be published.