प्रसिद्ध गायक Rahat Fateh Ali Khan यांचा नोकराला मारतांनाच व्हिडिओ व्हायरल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. राहत फतेह अली खान हे नोकराला चपले ने मारहाण करताना दिसत आहे. या व्हिडिओत राहत फतेह अली खान नोकराला एक प्रश्न वारंवार विचारत आहे. टेबलावरची ठेवलेली दारूची बाटली गेली कुठे ? अस ते नोकराला विचारत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाकिस्तान सह भारतात या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. आता राहत्यांनी या व्हिडिओ दरम्यान स्पष्टीकरण दिला आहे.

 

 

राहत फतेह अली खान यांच स्पष्टीकरण

राहत फतेह अली खान यांनी नोकराला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला. त्यानंतर आता त्यांच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ समोर आला आहे. मारहाण केली त्या नोकराला सोबत घेत, राहत फतेह अली खान यांनी स्पष्टीकरण दिला आहे. राहत फतेह अली खान यांनी नोकराची माफी मागितली आहे. त्यानंतर राहत स्पष्टीकरण देताना म्हणताय, “की हा गुरु आणि शिष्य मधला अंतर्गत विषय आहे. माझ्यासोबत माझा मुलगा आहे. माझा शिष्य आहे आमचं गुरु शिष्याचं असं नातं आहे. जेव्हा हा चांगलं काम करतो तेव्हा, त्याचं कौतुक होतं, तर जेव्हा हा चुकतो तेव्हा त्याला रागवल देखील जात. असे त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.