Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»बीआरएस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश
    जळगाव

    बीआरएस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 30, 2023Updated:August 30, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  ;- भारत राष्ट्रीय समिती अर्थात बीआरएस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव तालुका सरचिटणीस राजू भिला पाटील यांच्यासह बांभोरी गटाचे राष्ट्रवादीचे युवक गटप्रमुख नरेंद्र कौतिक पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज बीआरएस चे समन्वयक आणि जिल्हाध्यक्ष लकी टेलर लक्ष्मण गंगाराम पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या किल्ल्याला खिंडार पडले आहे. यापुढे आणखी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा बी आर एस पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.

    राष्ट्रवादीचे जळगाव तालुका सरचिटणीस राजू भिला पाटील यांचा बी आर एस पक्षांमध्ये लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर अण्णा यांच्या प्रमुख उपस्थित जळगाव तालुका उपसरचिटणीस सुभाष शामराव सपकाळे, सिताराम नारायण सपकाळे यांनी देखील बीआरएस पक्षांमध्ये प्रवेश केला. भारत राष्ट्र समिती अर्थात बी आर एस पक्षांमध्ये जळगाव जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश होत असल्याने इतर राजकीय पक्षांच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यानंतरही असेच पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष तथा समन्वयक लकी टेलर यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

    Bharat rashtra samiti brs jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif