मानव समाज अराजकतेच्या दिशेने, धर्माच्या पलिकडील अध्यात्म हाच उपाय

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज जगात मानव समाज मानसिक, वैचारिक अजारकतेच्या दिशेने प्रवास करीत आहे, छोट्या छोट्या बाबी वरुन भांडणे, तंटे प्रसंगी त्याचे रुपांतर युद्धा सारख्या प्रसंगात होणे हे त्याचचे द्योतक आहे. यास थांबविण्यासाठी धार्मिक विचारांच्या पलीकडील आध्यात्मिक विचार हाच एकमात्र उपाय आहे. असे प्रतिपादन माऊंट आबू राजस्थान येथील ब्रह्माकुमारीज् कॉन्सीलर ब्रह्माकुमार भगवान भाई यांनी केले.  येथील ढाके कॉलनी ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रात व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारी मीनाक्षी दीदी होत्या.

समारोप व्याख्यानात ते म्हणाले की, धर्म आणि अध्यात्मास एकच मानणे ही मोठी चूक आहे. विविध धर्मांना एकत्र आणण्याचे काम अध्यात्म करते ते कोणत्याही एका धर्माचा प्रचार वा प्रसार करीत नाही. अध्यात्म म्हणजे आधी आत्म् अर्थात आत्म्याचे ज्ञान म्हणजेच सर्वांना एका सूत्रात बांधण्याचे ज्ञान होय. जगातील सर्व मानव समाजातील व्यक्तींना आत्मिक ज्ञान समजल्यास धर्मांच्या भिंती तुटून पडतील आणि मानव समाज एक होईल हाच एकमात्र उपाय वसुधैव कुटुंबकम् बनविण्याचा आहे.

रद्दी कागदातून शिक्षण:

ब्रह्माकुमार भगवान भाई यांनी आपल्या जीवनप्रवासातील एक प्रसंग उलगडतांना सांगितले की, मेंढपाळ कुटुंबात असल्याने ते ठराविक एका जागेवर स्थिर नसे त्यामुळे शिक्षण होत नव्हते मात्र रद्दी वह्यांना धुवून सुकवून नंतर त्यावर गृहपाठ, वर्गपाठ करुन त्यांनी शिक्षण केले. त्यांच्यातील शिक्षणाच्या ओढीमूळे शिक्षक त्यांना प्रेरणा देत असत. एका किराणा रद्दीतून त्यांना राजयोग ध्यानाभ्यासाची ओळख झाली व आज ते  जगात  कुशल समूपदेशक – मनोविकास प्रशिक्षक म्हणून कार्य करीत आहे असे ते गहिरवून म्हणाले.

तीस दिवसात पन्नास व्याख्याने:

ब्रह्माकुमारीज् माऊंट आबू मुख्यालयात जीवन शिक्षण प्रशिक्षक ब्रह्माकुमार भगवान भाई हे एका महिन्याच्या सेवादौ-यावर जळगाव जिल्ह्यात आलेले होते. अवघ्या तीस दिवसात त्यांनी पन्नासहून अधिक व्याख्याने देण्याचा विक्रम केला आहे. त्यात विविध विषयांवरील मनोविकास व्याख्यानांचा समावेश आहे.  जळगाव जिल्ह्यात विविध शैक्षणिक, सामाजिक संस्था, शासकीय कार्यालये, कारागृह, अभ्यासिका, पोलिस कार्यालये, दवाखाने आदिंमध्ये त्यांनी अवघ्या तीस दिवसात पन्नास हून अधिक कार्यक्रम केलेत, चोपडा, धरणगाव, एरंडोल, पारोळा,पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, शेंदूणी, अडावद, कासोदा, म्हसावद, विरवाडे, नरडाणा, बांभोरी आणि इतर सेवाकेंद्रावर त्यांनी कार्यक्रम केलेत.

डॉ. सोमनाथ वडनेरे

मीडिया समन्वयक, ब्रह्माकुमारीज

[email protected]

9850693705

 

Leave A Reply

Your email address will not be published.