म्हशीला वाचवतांना पुरात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

म्हशीला शोधण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा बोरी नदीच्या पुरात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भिलाली तालुका पारोळा येथील शेतकरी कमलाकर हिम्मत पाटील (वय 50) हे ता. 22 रोजी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास आपल्या म्हशीला वाचवण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून पडले.

काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने बोरी नदीला अचानकपणे पुर आलाय. या पुरात पारोळा तालुक्यातील भिलाली येथील कमलाकर हिंमत पाटील या शेतकर्‍याची म्हैस सापडली. आपल्या म्हशीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी ते नदीच्या पात्रात उतरले. मात्र पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आल्यामुळे ते यात बुडाले.

सदर माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र यात यश आले नाही. अखेर यासाठी राज्य आपत्ती दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाला कमलाकर हिंमत पाटील यांचा मृतदेह आढळून आला. नदीपात्रात सुमारे दोनशे फुट अंतरावर त्यांचा मृतदेह पहाटे आढळून आला असून एसडीआरएफच्या पथकाने त्यांचे पार्थिव बाहेर काढले.

मयत कमलाकर हिंमत पाटील यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व मुलगी तसेच तीन भाऊ व त्यांचे कुटुंब असा परिवार आहे. ते दुध विक्रीचा व्यवसाय करत असून यातूनच त्यांनी मुलगा व मुलगीला उच्चशिक्षीत केले आहे. गावासह परिसरात ते दुधवाला आबा म्हणून परिचीत होते. दरम्यान भिलाली येथे घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली होती.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.