बोदवड नगरपंचायत : राष्ट्रवादी दोन तर शिवसेना एका जागेवर विजयी

0

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे. एकुण १७ जागासाठी मतदान झाले आहे. यापैकी तीन जागांचे निकाल लागले असून यात राष्ट्रवादीचा दोन, तर शिवसेनेनं एका जागेवर विजय मिळविला आहे.

बोदवड हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघातील नगरपंचायत आहे. या नगरपंचायतीवर खडसे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर प्रथमच या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या निवडणूकीत सर्वच्या सर्व १७ जागा लढविल्या आहेत.

खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेसला बोदवड नगरपंचायतीत बहुमत मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. एकनाथ खडसे यांनीही या निवडणूकीसाठी स्वत: मैदानात उतरूण प्रचार केला आहे, तर त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे यांनीही यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. खऱ्या अर्थाने एकनाथ खडसे यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.