ब्लुस्टार ची रूम एसीची बेस्ट इन क्लास श्रेणी सादर

0

लोकशाही, विशेष लेख 

 

ब्लुस्टार लिमिटेडने यंदाच्या उन्हाळ्याच्या हंगामासाठी बेस्ट इन क्लास अफोर्डेबल श्रेणी तसेच फ्लॅगशिप प्रिमिअम श्रेणीसह एसीच्या नवीन व्यापक अशा श्रेणीचे अनावरण नुकतेच मुंबईत केले. कंपनीने इनव्हर्टर (inverter), फिक्स्ड स्पीड (Fixed speed) आणि विंडो एसी सह अशा विविध प्रकारात तसेच प्रत्येक ग्राहक वर्गाच्या गरज पूर्ण करण्यासाठी विविध किंमत पातळीवर जवळपास ७५ मॉडेल्स बाजारात आणले आहेत. कंपनीने २०२० मध्ये बाजारात स्वतःचे एक मास प्रिमिअम ब्रँड म्हणून व्युव्हात्मक दृष्ट्या पुनर्स्थान केल्यानंतर किमतीच्या बाबतीत अतिशय चोखंदळ असलेल्या आणि टिआर २,३,४ आणि ५ या शहरातील बाजारपेठेत एसीचे प्रथमच खरेदीदार असलेल्या ग्राहकांच्या गरज पूर्ण करण्यासाठी तसेच परवडण्याजोगी स्वस्त स्प्लिट एसीची नवीन, आगळी आणि सर्वोत्कृष्ट श्रेणी आणलेली आहे. अर्थात त्यासाठी कंपनी आपल्या उत्पादन, संशोधन आणि विकास तसेच नाविन्यपूर्ण उत्पादनाच्या क्षमतेत सातत्याने वाढ करण्यावर भर देत आहे . ब्लुस्टार ने एकूण खर्च व्यवस्थापन कार्यक्रमाचा देखील अवलंब केला आहे त्याआधारे संपूर्ण खर्च मूल्य साखळीच्या कारक्षमतेते वाढ करण्यावर भर दिला जात आहे.

आत्मनिर्भर भारत अभियानाचा ब्लुस्टार हा एक मजबूत समर्थक असून त्याच्या पूर्ण मालकीच्या ब्लुस्टार क्लायमेट लिमिटेड या उपकंपनीद्वारे श्री सिटी येथे अत्याधुनिक उत्पादन सुविधा उभारली आहे. ब्लुस्टार क्लायमेटकने जानेवारी २०२३ मध्ये या उत्पादन प्रकल्पातून रम एसीचे व्यावसायिक उत्पादन सुरु केले आहे. ब्लुस्टार येथून काही नवीन उत्पादने यतयार करण्यासाठी या स्वयंचलित कारखान्यसह सज्ज आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.