डॉ. जी. डी. बेंडाळे राष्ट्रीय सॉफ्टवेअर स्पर्धा व पोस्टर सादरीकरण इम्पॅक्ट 2023

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथील मु .जे. महाविद्यालयातील संगणक शास्त्र प्रशाळेतर्फे डॉ. जी. डी. बेंडाळे राष्ट्रीय सॉफ्टवेअर स्पर्धा व पोस्टर सादरीकरण इम्पॅक्ट 2023 स्पर्धा घेण्यात आली डॉ. बेंडाळे फिरता चषक मु जे महाविद्यालयाने पटकविला.

मु.जे. महाविद्यालयातील संगणक शास्त्र व प्रशाळेतर्फे डॉ.जी. डी. बेंडाळे यांच्या स्मृतिपित्तर्थ डॉ. जी. डी. बेंडाळे राष्ट्रीय सॉफ्टवेअर स्पर्धा व पोस्टर सादरीकरण इम्पॅक्ट 2023 स्पर्धा अर्थात इम्पॅक्ट आयोजित केली होती. प्रा. ए .आर. राणे प्राचार्य कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड फिजिकल एज्युकेशन जळगाव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स .ना. भारंबे, संगणक शास्त्र प्रशाळेच्या संचालिका प्रा .हेमलता पाटील उपस्थित होते.

यावेळी प्रा . राणे यांनी मार्गदर्शन करताना आजचे जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे कसे वळते आहे आणि अशा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कसे काम करणे गरजेचे आहे याची जाणीव करून दिली .ऋतुजा सोनार आणि मांडवी साकडीकर या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. स्पर्धा सचिव डॉ. प्रा. लीना भोळे यांनी आभार मानले.

सॉफ्टवेअर स्पर्धेत पदवी गटातील 29 आणि पदव्युत्तर गटातील 9 तसेच पोस्टर सादरीकरणाकरिता पदवी गटात 21 व पदव्युत्तर गटात 7 संघांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्य वापरत स्पर्धेत सादरीकरण केले. राज्यभरातून विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमास धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आर. बी. वाघुळदे उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वीतेसाठी स्वप्नाली वाघुळदे, शुभांगी भंगाळे, वृषाली बऱ्हाटे, जयश्री फेगडे, जयेश गोसावी, राजेश सरोदे ,सचिन कोल्हे, भूषण पाटील, तेजस निकुंभ, मिलिंद पाटील, हरी, चौधरी आदींचे सहकार्य लाभले.

स्पर्धेचा निकाल : –
डॉ. जी. डी. बेंडाळे फिरता चषक विजेता संघ:मु. जे. महाविद्यालय ,जळगाव .

सॉफ्टवेअर स्पर्धा

पदवी गट: प्रथम – मोहम्मद अली, मोहम्मद रेहान, व्हिडिओ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग गुलबर्गा, द्वितीय – प्रसाद रुदल, मु.जे. महाविद्यालय जळगाव, तृतीय ( विभागातून),गौरव देवरे,मु.जे. महाविद्यालय जळगाव.

पदव्युत्तर गट : -प्रथम- पवार नीरज, मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव ,,

उत्तेजनार्थ पारितोषिक : सुदीप शरद मुरकर, ओंकार महेश भाटकर, गोगटे जोगलेकर कॉलेज, रत्नागिरी,

पोस्टर सादरीकरण स्पर्धा

पदवी गट: प्रथम- शेख इफत फातिमा साबीर, शेख मुबशेरा आरिफ, एकरा एच जे थीम कॉलेज, जळगाव

द्वितीय- पाटील गणेश रवींद्र, विसपुते श्रुती श्याम, पी आर घोगरे कॉलेज धुळे

तृतीय- भगवान आनम इद्रीस, शेख माहीम फातेमा हसन, डॉ. जी. डी बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव

उत्तेजनार्थ पारितोषिक – घनश्याम दिलीप महाजन, निकिता आसाराम पाटील, मु जे महाविद्यालय जळगाव

चिन्मय सतीश पाटील, धनाजी नाना महाविद्यालय, जळगाव

पदव्युत्तर गट : प्रथम- ओमकार महेश भाटकर, आरपी जोगळेकर कॉलेज रत्नागिरी

Leave A Reply

Your email address will not be published.