मांत्रिक पंड्याने केली जादू; आणि गंडली पाकिस्तानची विकेट…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने इमामला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इमामला फक्त 36 धावा करता आल्या. पाकिस्तानच्या डावातील 13व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हार्दिकने इमामला बाद केले. इमामला बाद करण्यापूर्वी हार्दिक बॉलशी बोलताना दिसला होता. पुढच्याच चेंडूवर हार्दिकने इमामला बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

यावर चाहत्यांकडून सोशल मीडियावर सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. चाहत्यांना हार्दिककडून जाणून घ्यायचे आहे की, इमामला बाद करण्यापूर्वी त्याने चेंडूला काय सांगितले आणि कोणता मंत्र जपला. चाहते याबाबत मीम्सही शेअर करत आहेत.

 

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. शफीकला बाद करून सिराजने भारताला पहिले यश मिळवून दिले, त्यानंतर हार्दिकने इमामला बाद केले. त्याचवेळी, आजच्या सामन्यात इशान किशनच्या जागी शुभमन गिलचा भारतीय इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.

Leave A Reply

Your email address will not be published.