मोठी बातमी : भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछड यांना खासदारकीची उमेदवारी

0

मुंबई ;- भाजपाने महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण यांच्याबरोबर नांदेडचे डॉ. अजित गोपछडे यांनाही तिकीट जाहीर केलं आहे. अशा प्रकारे महायुतीतर्फे 4 उमेदवारांची घोषणा झाली आहे. अद्याप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.

काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद भूषवणारे अशोक चव्हाण यांनी परवा अचानक पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर काल त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यावेळीच चर्चांना उधाण आले होते. अपेक्षेप्रमाणे अशोक चव्हाण यांना राज्यसभेच्या यादीत भाजपाकडून स्थान मिळाले. त्यांच्यासोबतच पुण्यातील कोथरूड मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनाही यात स्थान मिळाले. भाजपाचे महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून आमदारकीची उमेदवारी देताना, मेधा कुलकर्णी यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर, मेधा कुलकर्णी नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. अखेर त्यासोबत नांदेडचे डॉक्टर अजित गोपछडे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.