खड्डे न बुजविल्यास आंदोलन करू : भाजपा तर्फे मनपा आयुक्तांना निवेदन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या कारणास्तव महानगरपालिकेच्या कोट्यातील निधी प्राप्त होवून देखील रस्त्यांची कामे अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते अशी अवस्था शहरात निर्माण झाली आहे. पावसाळ्यात नवीन रस्त्यांची कामे सुरू करता येणार नसल्याने नागरिकांना मनस्तापास सामोरे जावे लागत आहे.पावसाळ्याचे दिवस लक्षात घेवून रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाच्या पाण्याचे डबके साचलेले आहेत. त्यामुळे डासाचे प्रमाण वाढलेले असून साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी त्वरित रस्त्यातील खड्डे बुजवण्यात यावे असे निवेदन जळगाव शहर भारतीय जनता पार्टीतर्फे मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांना देण्यात आले.

शहरातील रस्त्याचे खड्डे त्वरित न बुजविल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, नितीन इंगळे, नगरसेविका उज्वला बेंडाळे, सुरेखा तायडे,गायत्री राणे, दीपमाला काळे, शोभा बारी, नगरसेवक महेश चौधरी, विजय वानखेडे, मयूर कापसे, जितेंद्र मराठे, सुरेश सोनवणे, विजय पाटील,मंडल अध्यक्ष शक्ती महाजन,मोहम्मद नूर, मोर्चा अध्यक्ष लता बाविस्कर, रेखा पाटील, शालू जाधव, वर्षा सपकाळे, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, गणेश माळी, प्रशांत सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.